Sanjay Raut | 'औरंगजेबाला आम्हीच कबरीत टाकलं; तुमचंही तेच करणार' राऊतांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut on Nagpur Visit

'औरंगजेबाला आम्हीच कबरीत टाकलं; तुमचंही तेच करणार' राऊतांचा इशारा

एआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी इम्तियाज जलील यांच्यासह अन्य नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर उपस्थिती लावली. यावरून आता राज्यात राजकारण पेटलं आहे. एमआयएमच्या नेत्यांवर भाजप, शिवसेना आणि मनसेचे नेते टीका करत आहेत. संजय राऊत यांनीही आता ओवैसी यांच्यावर टीका केली आहे. (Sanjay Raut on Akbaruddin Owaisi)

एमआयएमचे नेते ज्याला रितीरिवाज म्हणत आहेत, ते रितीरिवाज नाहीत, असं राऊत म्हणाले. वारंवार महाराष्ट्रात यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीसमोर गुढगे टेकून आम्हाला खिजवायचा प्रयत्न करायचा. पण औरंगजेबाला कबरीत आम्ही टाकलं. २५ वर्षे तो महाराष्ट्रात मराठ्यांशी लढत राहिला. कधीतरी तुम्हाला ही त्याच कबरीत जावं लागणार आहे, असं राऊत यांनी म्हटलं. (Sanjay Raut Latest News)

हेही वाचा: महाराष्ट्रात कोणाच्या केसाला धक्का लागत नाही, राऊतांचा राज ठाकरेंना टोला

औरंगजेब सुफी संत नव्हता. त्याने महाराष्ट्रावर आक्रमण केले. छत्रपतींच्या मराठ्यांची त्यांच्यासोबत मोठी लढाई झाली आहे. आता हे ओवैसी मंडळी आम्हाला चॅलेंज वगैरे देत आहेत. आम्ही ते स्वीकारतो. तुम्ही लोक औरंगजेबाचे भक्त आहात. त्यामुळे तुमचेही लवकरच त्याच्यासारखे हाल होणार, अशा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

काश्मिरचा माहोल बिघडवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झालाय

  • काश्मिरी पंडितांची घरवापरसी भाजपचा मुख्य मुद्दा होता.

  • मोदींनी राजकारण सोडून बोललं पाहिजे

  • काश्मिरमधील सामाजिक जनतेचं जीवन असुरक्षित आहे

  • काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचे प्रश्न हनुमान चालिसाचा मुद्दा उचलून सोडवला जाऊ शकत नाही

  • शिवसेना काश्मीरच्या मुद्द्याकडे संवेदनशीलतेने पाहात आहे

  • केंद्र सरकारने याकडे नीट पाहावं लागेल

  • एकीकडे चीन घुसला आहे. हे परवडणारं नाही

Web Title: Sanjay Raut Alleges Akbaruddin Owaisi Aurangabd Visit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Raut
go to top