Sanjay Raut | त्याने स्वत:ला नख मारलं, कोर्टाचा निकाल लागताच राऊत सोमय्यांवर भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

त्याने स्वत:ला नख मारलं, कोर्टाचा निकाल लागताच राऊत सोमय्यांवर भडकले

नवनीत राणांच्या हनुमान चालिसा पठणामुळे राज्यात मोठ्या राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांनी आधी मोहित कंबोज आणि त्यानंतर सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केल्याने भाजपची या प्रकरणात अधिकृत एन्ट्री झाली आहे. (sanjay raut alleges kirit somaiya)

त्यातच राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. यानंतर त्यांना कोर्टात हजर केल्यावर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना 'अॅक्शन मोड' मध्ये आली आहे. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राणा आणि किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. (Navneet Rana Vs Shivsena)

हेही वाचा: 'कायदा सुव्यवस्था धोक्यात, केंद्रात जाण्याआधी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं'

राणांच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक तयार करून सरकार उलथवण्याचा प्रयत्न असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. धर्माच्या नावावर राज्य उलथवण्याचा प्रयत्न कुठेही होऊ नये. मात्र अशा प्रकारे एखादा लोक प्रतिनिधी सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला भाजप फूस देत आहे, असं राऊत म्हणाले.

मागच्या सरकारने भीमा-कोरेगावमध्ये हेच केलं. विचारवंतांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. संघर्ष निर्माण करायचा. मग त्यांच्या मनानुसार घडलं की राज्यपलांकडे जायचं. आणि राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची, हा कट भाजप रचत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

  • काल राणा जेलमध्ये होते. तिथे ते हनुमान चालिसा वाचू शकतात.

  • त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरात जाऊन वाचावं.

  • तुम्हाला वाटेल तिथे वाचा...पण आम्हाला आव्हान देऊ नका.

  • तुमच्या खांद्यावर बंदुक ठेऊन भाजप बार उडवत आहे.

  • गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक भाजपचे शिलेदार आहेत.

Web Title: Sanjay Raut Alleges Bjp Over Kirti Somaiyya Attack In Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanjay Raut
go to top