संजय राऊत-फडणवीस भेटीवर पडदा; भाजप प्रवक्त्यांचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून या भेटी संदर्भात खुलासा केला आहे. त्यामुळं दोन्ही नेत्यांमधील भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.

काय म्हणाले भाजप प्रवक्ते?
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्विटमध्ये दोन्ही नेत्यांमधील भेट राजकीय नव्हती तर, सामना दैनिकासाठी मुलाखत घेण्याची कल्पना संजय राऊत यांनी मांडली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही मुलाखत कोणत्याही प्रकारची काट-छाट न करता प्रसिद्ध करावी, असं स्पष्ट मत देवेंद्र फडवणीस यांनी या बैठकीत मांडल्याची माहिती केशव उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलीय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut and devendra fadanvis meeting why keshava upadhye tweet