esakal | उद्धव ठाकरेंवर जमीन व्यवहाराचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरेंवर जमीन व्यवहाराचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे कुटुंबीयांमध्ये जमीन व्यवहार झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर आरोपांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरेंवर जमीन व्यवहाराचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे कुटुंबीयांमध्ये जमीन व्यवहार झाला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. त्यानंतर आरोपांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये जे काही व्यवहार झाले होते, ते पूर्णपणे कायदेशीर आहे. याबद्दल शपथपत्रात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. कायदेशीर व्यवहारावरून आरोप करण्याचे कोणतेही कारण नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

तुम्ही जे आरोप करताय ते सर्व बिनबुडाचे आहेत. त्यामुळे जे आरोप करताय ते सिद्ध करा, अन्यथा आरोप करू नका असही राऊत म्हणालेत. तर  आता तुम्हाला घरी बसवले आहेच, त्यामुळे आता पुढील 25 वर्ष घरीच बसावे लागणार असल्याचा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.

अधिक वाचा-  शेठजी, जरा जपून; किरीट सोमय्यांच्या आरोपांवर संजय राऊतांचा पलटवार
 

पुढे संजय राऊत म्हणाले की, खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा, हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगणार नाहीत. मुळात अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण आहे. त्यावर मी बोलत नाही. पण एक आमची मराठी भगिनी, तिचं कुंकू पुसलं गेलं. त्या स्वतः आणि त्यांची कन्या. या गेल्या अनेक महिने न्यायासाठी आक्रोश करताहेत. त्यावर हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी, प्रवक्ते बोलायला तयार नाहीत. आणि आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावेळी तपासाची दिशा भरकटून टाकण्यासाठी हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते हे असे मुद्दे घेऊन समोर येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

अधिक वाचा-  दिवाळीच्या पूर्व संध्येला ATMची साडे चार कोटींची रोख लंपास, व्हॅनही पळवली

आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. त्यासाठी ही फडफड सुरू आहे, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही. २१ व्यवहार केल्याचा आरोप करताहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. ही त्यांना वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्षे चालणार,असंही राऊत यांनी ठणकावलं.

Sanjay Raut attack on Kirit Somaiya who accused Uddhav Thackeray of land dealing