esakal | दसरा मेळाव्यात मुखमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर असतानाच संजय राऊतांनी काढला फडणवीसांचा विषय
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्यात मुखमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर असतानाच संजय राऊतांनी काढला फडणवीसांचा विषय

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तमाम शिवसैनिकांना संबोधित केलं

दसरा मेळाव्यात मुखमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर असतानाच संजय राऊतांनी काढला फडणवीसांचा विषय

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून तमाम शिवसैनिकांना संबोधित केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतरचा यंदाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर कोरोनातून मुक्त व्हावं या शुभेच्छा दिल्यात . 

संजय राऊतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे : 

 • आज अभूतपूर्व परिस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय, यंदाचा दसरा मेळावा जगाने नोंद घेतली असती इतका विराट झाला असता.
 • यापुढे जे जे होईल ते 'महा' होणार  
 • आगामी काळात महाराष्ट्र दिल्लीचं तख्त राखणार 
 • मी गेल्या वेळी म्हणालेलो, पुढल्या वर्षी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार. हे सहज सांगितलं नव्हतं.  
 • आपण मुख्यामंत्री झाला म्हणजे महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री झाली
 • हिंदुत्वाचे धडे आम्हाला कुणाकडून घ्यायची गरज नाही हे मुख्यमंत्री सांगतात त्यामागे वीर सावरकरांचे विचार 

महत्त्वाची बातमी उद्धव ठाकरेंकडून भाजपचा खरपूस समाचार, दसरा मेळावा भाषणातील सर्व मुद्दे वाचा

 • सावरकर आणि शिवसेनेचं घट्ट नातं 
 • या महाराष्ट्रावरील प्रत्येक संकटाशी लढा देताना उद्धव ठाकरे कुठेही डगमगलेले दिसले नाही, आरोप चिखलफेक झालेत पण कशाचीही पर्वा न करता ते पुढे चालत राहिले याची नोंद देशाच्या इतिहासात होईल 
 • कुणी कितीही चिखलफेक केली, कारस्थानं केलीत तरीही हे सरकार पाच वर्ष टिकल्याशिवाय राहणार नाही 
 • पुढच्या पंचवीस वर्षांचा करार करून पुन्हा सत्तेत येऊ 
 • एक शिवसैनिक, म्हणजे लाख शिवसैनिक 

फडणवीसांबाबत राऊत म्हणतात... 

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणालेत की, राज्याचे सक्षम, कार्यक्षम विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावे अशा शुभेच्छा संजय राऊत त्यांनी दिल्यात. लढण्यासाठी समोर पैलवान असायला पाहिजे असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

sanjay raut on devendra fadanavis at dasara melwa speech program of uddhav thackeray and shivsena