मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांनी केलं भाष्य, हसले आणि म्हणाले...

मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर पवारांनी केलं भाष्य, हसले आणि म्हणाले...

मुंबई- शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी अशा एका प्रश्नाचं उत्तरं दिलं आहे का, तो प्रश्न सर्वांनाच पडला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत 'शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहे' असं म्हटलं होतं. मोदींनी या वक्तव्याचा अनेक सभांमध्ये दाखलाही दिला आहे. यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच या मुलाखतीतून उत्तर दिलं आहे. 

संजय राऊतांनी पवारांना प्रश्न विचारला की, आपण मोदींचे गुरू आहात असे ते म्हणतात. अशा वेळी आपण आपल्या शिष्याला हे सांगायला हवं की, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय आपल्याला कठोरपणे घ्यावे लागतील? राऊतांच्या या प्रश्नाला पवार यांनी हसून उत्तर दिले. 

पवारांनी यावर उत्तर दिलं की, मला मोदींचा गुरू म्हणून त्यांना आणि मला दोघांनाही अडचणीत आणू नका. गुरू वगैरे सोडा, राजकारणात कोणी कोणाचं गुरू असत नाही. आम्ही लोक अनेकदा एकमेकांच्या संदर्भात सोयीची भूमिका मांडत असतो,' असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

पुढे पवार म्हणाले की, अलीकडे काही माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. कोरोनाचं संकट आल्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांच्याशी बोललो असेन इतकेच. त्या पलीकडे नाही,' असंही पवार यांनी सांगितलं.

कोरोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं संपूर्ण देश आर्थिक अडचणीत सापडला असून राज्यांना याची सर्वाधिक झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारनेच राज्यांना मदत केली पाहिजे, अशी आग्रही भूमिका शरद पवार यांनी मांडली. 

या सगळ्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्था रिव्हाईव्ह करण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता असल्याचंही पवार म्हणालेत. मध्यंतरी एक गृहस्थ इथे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. दुर्दैवाने काय झालं मला माहीत नाही, ते सोडून गेले. आता अशी जी माणसं आहेत, ज्यांना आपण जाणकार म्हणू शकू त्यांच्याशी बोललं पाहिजे किंवा डॉ. मनमोहन सिंगांसारखे लोक आहेत. असंही पवारांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे सर्व मार्ग राज्यांतूनच जातात. राज्याची अर्थव्यवस्था, व्यवहार आणि उत्पादन वेगाने झाले तर संपत्ती निर्माण होईल आणि त्यातून त्याचा हिस्सा केंद्राला मिळेल हे साधं गणित आहे. त्यामुळं केंद्राला स्वत:चं दुकान चालवायचं असेल तर राज्यांची दुकानं आधी चालवली पाहिजेत, असं पवार म्हणाले. 

Sanjay raut interview sharad pawar reaction modis guru statement

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com