राम मंदिर भूमिपूजन कार्यंक्रम आणि उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावर संजय राऊत यांची 'मोठी' प्रतिक्रिया, राऊत म्हणतात

प्रशांत बारसिंग
Monday, 20 July 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपचे नाव न घेता टीका केली.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपचे नाव न घेता टीका केली. राऊत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अयोध्येशी शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही, यावेळी त्यांनी म्हटले की, अयोध्येशी शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. हे नाते केवळ राजकारणासाठी नाही. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असे राऊत म्हणाले. 

मोठी बातमी - विमानतळांवर प्रवासी पितायत हळदीचं दूध, कैरी आणि आवळ्याचं पन्हं; 'कोरोना' असं बदलतोय आपलं जीवनमान...

अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. या रस्त्यातील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. राम मंदिरासाठी श्रद्धा आणि हिंदुत्त्वाच्या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केले आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा संपन्न होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचे निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी - मुंबईतल्या कोरोनासंदर्भात IIT चा दिलासादायक अहवाल

निमंत्रण यादीत शिवसेनेचे नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र, भाजपशी फारकत घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आली. 

( संकलन - सुमित बागुल )

sanjay raut on ram mandir bhoomi pujan and invitation to uddhav thackery


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut on ram mandir bhoomi pujan and invitation to uddhav thackery