esakal | विमानतळांवर प्रवासी पितायत हळदीचं दूध, कैरी आणि आवळ्याचं पन्हं; 'कोरोना' असं बदलतोय आपलं जीवनमान...
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळांवर प्रवासी पितायत हळदीचं दूध, कैरी आणि आवळ्याचं पन्हं; 'कोरोना' असं बदलतोय आपलं जीवनमान...

दहीभात पचायला अत्यंत हलका आणि शरीरासाठी पौष्टिक असतो. त्यामुळे विमानतळावर दही भाताची मागणी वाढलेली पाहायला मिळतेय.

विमानतळांवर प्रवासी पितायत हळदीचं दूध, कैरी आणि आवळ्याचं पन्हं; 'कोरोना' असं बदलतोय आपलं जीवनमान...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनामुळे आपलं आयुष्य आणि आपलं जीवनमान कसं बदलतंय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी. मे महिन्यात आंतरदेशीय विमानसेवा सुरु झाली. अशात विमानांमध्ये देण्यात येणाऱ्या पेयांमध्ये आता बदल झालेले दिसतायत. विमानांच्या किचनमधील पेयांमध्ये बदल होऊन आता हळदीचं दूध, तुळस आणि पुदिन्याची शिकंजी, सातूची पेज,आवळा आणि कैरीचं पन्हं प्रवाशांना देण्यात येतंय. नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी पेय आता सर्व मेट्रो एअरपोर्टवर देखील विकण्यात येणार आहेत.      

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेयांच्या मागणीत वाढ : 

देशातील विविध एअरपोर्ट्सवर तीनशेपेक्षा जास्त आउट्लेस्ट सांभाळणारे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गौरव दिवाण यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणालेत, भलेही अजूनही कॉफी आणि चहाची विक्री मोठया प्रमाणात होतेय, मात्र इम्युनिटी बूस्टर पेयांच्या विक्रीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसात इम्युनिटी बूस्टर म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय जास्त लोकप्रिय होताना पाहायला मिळतायत. 

मोठी बातमी - मुंबईतल्या कोरोनासंदर्भात IIT चा दिलासादायक अहवाल

हळदीच्या दुधाची वाढती मागणी 

गौरव यांच्या माहितीप्रमाणे एअरपोर्टवर विकण्यात येणाऱ्या खान-पानाच्या पदार्थांमध्ये मोठे बदल झालेत. दिल्ली एअरपोर्टवर हळदीचं दूध हे तिसऱ्या नंबरवर सर्वाधिक विकलं जाणारं पेय आहे. याशिवाय कोलकाता विमानतळावर तुळशी पुदिना शिकंजी या पेयाला जास्त पसंती मिळतेय. चेन्नई एअरपोर्टवर 'रस्सम'ला  जास्त मागणी आहे. त्यामुळे आम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय पॅकबंद बाटलीतून विकण्याची आता तयारी करतोय. 

दहीभाताचा भाव वधारला : 

दहीभात पचायला अत्यंत हलका आणि शरीरासाठी पौष्टिक असतो. त्यामुळे विमानतळावर दही भाताची मागणी वाढलेली पाहायला मिळतेय. दक्षिण भारतात विमानतळांवर कोरोनाआधी दही भाताची मागणी ही केवळ दोन ते तीन टक्के होती. ही मागणी आता वाढलीये आणि आता हीच मागणी पंधरा ते वीस टक्के झालीये. हा बदल कोरोनामुळे झालाय असंही गौरव म्हणतायत. 

मोठी बातमी - ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह.. ट्विटरवरुन दिली माहिती 

लोकांच्या ऑर्डर देण्याच्या पद्धतीत देखील बदल  :

कोरोनानंतर नॉन व्हेज खाण्याची मागणी मोठया प्रमाणात घटली आहे. केवळ अन्नपदार्थांच्या मागणीत बदल झालेले नसून ऑर्डर देण्याच्या पद्धतीही आता बदलल्याचं पाहायला मिळतंय. आता एअरपोर्टवर कर्मचारी आयपॅड घेऊन फिरतात आणि नागरिक ऑर्डर दिल्यानंतर QR कोड स्कॅन करून डिजिटल पेमेंट करताना पाहायला मिळतायत. 

loading image