esakal | ''आपल्या जवळच्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री सोडत नाहीत, कारवाई करणार''
sakal

बोलून बातमी शोधा

''आपल्या जवळच्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री सोडत नाहीत, कारवाई करणार''

संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

''आपल्या जवळच्या व्यक्तीलाही मुख्यमंत्री सोडत नाहीत, कारवाई करणार''

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: मंगळवारी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट असताना ही गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाची परिस्थिती पाहता जमलेली गर्दी गंभीर होती. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुख्यमंत्री हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात.  काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.  मुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमली होती. यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 

शरद पवार नाराज?

पोहरादेवी येथे संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. यावर संजय राऊत यांना विचारलं असा मला यासंदर्भात कुठलीही माहित नाही, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- मंत्रालय आता दोन शिफ्टमध्ये; तात्काळ नियोजन करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Sanjay raut reaction on sanjay rathod poharadevi crowd

loading image