फडणवीसांना राऊतांचं जशास तसं उत्तर; "सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलो आहे" वक्तव्याची करून दिली आठवण

फडणवीसांना राऊतांचं जशास तसं उत्तर; "सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलो आहे" वक्तव्याची करून दिली आठवण

मुंबई : आज भाजपकडून सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. "महाराष्ट्रात इतक्या वर्षात धमकावणारा मुख्यमंत्री पहिला नाही" या शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान याला शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. 

हेही वाचा : फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे वाचा
   
संजय राऊत म्हणालेत की, आज विरोधीपक्षनेते खूप चांगल्या मूडमध्ये होते. विरोधीपक्षनेत्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. मात्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांची सामनातील संपूर्ण मुलाखत त्यांनी वाचली, पहिली ऐकली हे महत्त्वाचं. आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. विरोधीपक्षाने देखील आपल्या पद्धतीने टीका टिपणी करून वर्षपूर्ती साजरी केली तर त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी धमकीची विधाने केलीत असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांनी त्यांच्याच वक्तव्याची आठवण करून दिली. 

पुढे राऊत म्हणालेत, फडणवीस एकदा म्हणाले होते की, जे की रेकॉर्डवर देखील आहे, "सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलो आहे. सगळ्यांच्या कुंडल्या, विरोधकांच्या कुंडल्या किंवा सरकारला विरोध करणाऱ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही काय भाषा होती? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. मला वाटतं ही तर भयंकर धमकीची भाषा होती. तुम्ही यंत्रणा वापरून तुम्हाला विरोध करणाऱ्यांच्या कुंडल्या आपल्या जवळ ठेवत होतात. अशी अनेक त्यांची विधाने माझ्या स्मरणात आहेत. जर एखादी केंद्रीय तपस यंत्रणा दडपशाही पद्धतीने महाविकास आघाडीतील लोकांच्या मागे बेकायदेशीरपणे लागत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणे हे मुख्यमंत्र्यांचे काम आहेच,  मात्र ते शिवसेनेचे पक्ष प्रमुख देखील आहेत हे लक्षात घ्या. 

sanjay raut retaliates to the allegations made by fadanvis on CM uddhav thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com