"अशा उचापती करायला गेलं की..."; संजय राऊतांना सणसणीत टोला

Sanjay-Raut-Sad
Sanjay-Raut-Sad
Updated on

मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील पक्षाकडून करण्याची मागणी सहयोगी पक्षांकडून होत आहे. या आघाडीचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडं देण्याला यूपीएतील घटक पक्षांकडून कोणताही विरोध नाही. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे यूपीएचं नेतृत्व देण्यात येईल, असे संकेत अंदाज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मत व्यक्त केलं. त्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. युपीएचं घटक पक्ष नसतानाही त्यांनी असं विधान करणं हास्यास्पद आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलं. याच वक्तव्यावरून भाजपने संजय राऊतांची खिल्ली उडवली.

काय म्हणाले हुसेन दलवाई?

"संजय राऊतांचं विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय आहे. ते काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार कोणी दिला? स्वत: शरद पवारही याबाबत बोलत नाहीत. राष्ट्रवादी हा भारतीय स्तरावरचा पक्ष नाही. हा पक्ष विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित आहे. त्यामुळे काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे”, असं हुसेन दलवाई म्हणाले.

भाजप नेत्याने उडवली खिल्ली

या मुद्द्यावरून संजय राऊतांची भाजप नेते अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली. "आपण UPA त नसताना त्याच्या अध्यक्षपदाच्या उचापती करायला गेलं की कांग्रेसाच्या हुसेन दलवाईंकडूनही तोंडघशी पडायला होतं... अर्थात संजय राऊत आदत से मजबूर हैं...", असं ट्वीट करत त्यांनी राऊतांना टोला लगावला.

दरम्यान, सध्या युपीए आघाडीचं अध्यक्षपद कोणाकडे द्यावं यावरून बराच उहापोह सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com