"चोरीचा माल विकत घेणाराही..."; राऊत चंद्रकांतदादांवर बरसले

महाविकास आघाडीवरील भाजपच्या टीकेला राऊतांचं सडेतोड प्रत्युत्तर
"चोरीचा माल विकत घेणाराही..."; राऊत चंद्रकांतदादांवर बरसले
Updated on
  • महाविकास आघाडीवरील भाजपच्या टीकेला राऊतांचं सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई: महाविकास आघाडीतील तीन पक्षांची सरकार स्थापनेबद्दल चर्चा सुरू असताना अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी सत्तास्थापनेचा दावा करत शपथविधी केला. यावेळी अजित पवार यांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र आणले होते. या पत्रावरून गेले काही दिवस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून आमदारांच्या सह्यांचे पत्र चोरून आणणं ही नैतिकता होती का? असा सवाल चंद्रकांत दादांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना सणसणीत उत्तर दिले. (Sanjay Raut slammed Chandrakant Patil Criticizing Ajit Pawar MLA Letter from NCP Chief Sharad Pawar Drawer)

"चोरीचा माल विकत घेणाराही..."; राऊत चंद्रकांतदादांवर बरसले
Video: धावती ट्रेन पकडण्यासाठी तरूणाने मारली उडी अन्...

"शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून कोणीतरी आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरलं आणि अजित पवारांसोबत भाजपने शपथविधी केला. त्याबाबत सध्या भाजपचे लोक टीका करताना दिसतायत. पण त्यांनी हे पाहायला हवं की त्यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं. भाजपच्या लोकांना जर माहिती होतं की ते पत्र चोरीचं होतं तर तुम्ही त्यांच्यासोबत पुढील घडामोडी का घडू दिल्यात? दुसऱ्यांवर आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांना मी सांगू इच्छितो की चोरीच्या पत्राबद्दल त्यांनी न बोललेलंच बरं.. कारण असा चोरलेला माल विकत घेणाराही तितकाच गुन्हेगार असतो", असं सणसणीत प्रत्युत्तर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

Sanjay Raut
Sanjay RautSakal
"चोरीचा माल विकत घेणाराही..."; राऊत चंद्रकांतदादांवर बरसले
मुख्यमंत्री ठाकरे-पंतप्रधान मोदी भेटीवर संजय राऊत म्हणतात...

"शिवसेनेने भाजपशी दगाफटका केला असं भाजपची लोकं म्हणत असतील तर त्यांनी या भूमिकेतून आता बाहेर आलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. आमच्यासाठी मंदिराच्या स्थानी असलेल्या मातोश्रीतील बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत हा शब्द देण्यात आला होता. पण तो शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नाही. ही बाब आम्हाला आजही टोचते. त्यामुळे भाजपने आता आरोप बंद करावेत आणि चोरीचं पत्र, दगाबाजी वैगेरे या सगळ्यातून बाहेर पडून विरोधी पक्षाला एक खंबीर नेतृत्व द्यावे", असे राऊत त्यांनी सांगितले.

"चोरीचा माल विकत घेणाराही..."; राऊत चंद्रकांतदादांवर बरसले
Lockdown Effect: मुंबईतील 5-स्टार 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com