
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की, "ED ची नोटीस कुठे आहे ?
मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ची नोटीस पाठवण्यात आली आहे असं समजतंय. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भारतीय जनता पक्षाला आपल्या खास शैलीत सुनावलं आहे.
महत्त्वाची बातमी : यंदाचा थर्टीफर्स्ट साजरा करा शिस्तीत, मुंबईच्या रस्त्यांवर ३५ हजार पोलिस घालणार गस्त
काय म्हणालेत संजय राऊत :
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की, "ED ची नोटीस कुठे आहे ? आता मी माझा माणूस भाजपच्या ऑफिसमध्ये पाठवला आहे. हे राजकारण ज्यांना करायचंय त्यांना करू द्या". दरम्यान आज दुपारी दोन वाजता संजय राऊत ED नोटिशीवर शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेऊन विस्तृत बोलणार आहेत. काल संध्याकाळी संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून संकेत देत "आ देखें ज़रा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया" असं ट्विट केलं होतं. या ट्विटनंतर आज मोजक्या शब्दात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने PMC बँक घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावला आहे. उद्या म्हणजेच २९ तारखेला वर्षा राऊत या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ED समोर हजर राहू शकतात.
sanjay raut to speak to meat at 3 pm from shivsena bhavan on ED notice to varsha raut