"शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, 'ती' गोड बातमी मुंनगंटीवार देतील" - संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 November 2019

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (बुधवार) संध्याकाळी पत्रकारांशी चर्चा केली. 'सुधीर मुंनगंटीवार यांच्याकडूनच शिवसेनचा मुख्यमंत्री होईल अशी गोड बातमी येईल' असं क्तव्य संजय राऊत यांनी करत भाजपाला टोला लगावला आहे. उद्या भाजप नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत, त्यावर उत्तर देताना, "राज्यपालांना आम्हीही भेटलो, विनोद तावडे भेटले, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे नेते भेटलेत त्यामुळे राज्यपालांना कुणीही भेटू शकतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ते जर राज्यपालांना 145 आमदारांची यादी देणार असतील तर भाजपने सरकार बनवावं" अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीय.

कॉंग्रेस नेत्यांच्या भावनांचा मला आदर :

दरम्यान, काँग्रेसमधील काही आमदार आणि नेत्यांनी राज्यात भाजपची सत्ता येऊ नये, यासाठी प्रयत्न चालवल्याची माहिती मिळाली आहे. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो, असेही संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले, 'काँग्रेसच्या आमदारांनी राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यातील काही नेत्यांचा आणि आमदारांचा माझ्याशी थेट संपर्क झाला आहे. पण, त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. राज्यातील जनतेला, सामान्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्री , स्वस्थ बसणार नाहीत, असा मला ठाम विश्वास वाटतो.

शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक :

उद्या शिवसेनेच्या आमदारांचीही मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांशी बोलणार असून सेना महायुतीच्या सत्तेतच सामिल होणार की सत्तेचं एखादं नवं गणित जुळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झालीय.

Webtitle : sanjay raut spoke to press in mumbai on maharashtra government formation crisis

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut spoke to press in mumbai on maharashtra government formation crisis