'हा महाराष्ट्राला धोका'; संजय राऊत भडकले

टीम ईसकाळ
Monday, 2 December 2019

'केंद्राकडून देण्यात आलेल्या 40 हजार कोटींच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले' असे वक्तव्य हेगडे यांनी केले. यावर पलटवार करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. 

मुंबई : भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 'केंद्राकडून देण्यात आलेल्या 40 हजार कोटींच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले' असे वक्तव्य हेगडे यांनी केले. यावर पलटवार करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. 

फडणवीसांचे चार दिवसांचे सरकार एक चाल होती, भाजप खासदाराचा गाैप्यस्फोट

गेले महिनाभर संजय राऊत ट्विटवर ट्विट करत आहेत, भाजपला टोला लगावत आहेत. आजही त्यांनी हेगडे यांच्या वक्तव्याला विरोध करत हा महाराष्ट्राशी धोका आहे, असे म्हणले आहे. त्यांनी ट्विट केलंय की, ''केंद्राकडून देण्यात आलेल्या 40 हजार कोटींच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले? हा महाराष्ट्राशी धोका आहे, महाराष्ट्र के साथ गद्दारी है|' त्यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

भाजपाचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांचे मुख्यमंत्री का झाले यामागील कारण सांगत खळबळजनक दावा केला आहे. 

Video : पुणे : फुगेवाडी दुर्घटनेतील मजूराचा अखेर मृत्यू

संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट केले होते. “शेठ, जिनके घर शीशे के होते हैं, वह दुसरो के घर पत्थर नहीं फेंका करते” असे म्हणत पुन्हा एकदा त्यांनी भाजपला टोला लगावला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut tweeted against Anantkumar Hegde statement about Devendra Fadnavis