Video : पुणे : फुगेवाडी दुर्घटनेतील मजूराचा अखेर मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

दापोडी-फुगेवाडी उड्डाणपूला जवळील दुर्घटनेत खोल खड्ड्यात गाडल्या गेलेले बिगारी मजूर नागेश जमादार यांचा मृतदेह पहाटे 3.30 वाजता बचाव पथकांनी बाहेर काढला. सुमारे दहा तास हे बचाव कार्य सुरु होते. 

पिंपरी : दापोडी-फुगेवाडी उड्डाणपूला जवळील दुर्घटनेत खोल खड्ड्यात गाडल्या गेलेले बिगारी मजूर नागेश जमादार यांचा मृतदेह पहाटे 3.30 वाजता बचाव पथकांनी बाहेर काढला. सुमारे दहा तास हे बचाव कार्य सुरु होते. 

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी दिलेल्या माहिती नुसार, या दुर्घटनेत, अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांचे निधन झाले. तर, दलाच्या इतर दोघा जवानांसह दोन जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. 

या शोध आणि बचाव कार्यात पालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ, बीईजी, पोलीस, मनपा वैद्यकीय व पाणी पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय (तहसिलदार), स्वयंसेवी संस्था आणि पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आदी सहभागी झाले होते.

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

अग्निशमन दलाचे एकूण 5 बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, एनडीआरएफच्या बचाव पथकालाही मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आले. इतर जवानांनी फायरमन फुंडे, गोगावले यांना बाहेर काढण्यात यश आले. तर विशाल जाधव यांना बाहेर काढल्यावर त्यांना वैद्यकीय उपचासाठी दाखल केले असताना डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 labor dies in Fugewadi mishap in Pune