esakal | संजय राऊत यांचे कुटुंब दूर का पळत आहे: किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत यांचे कुटुंब दूर का पळत आहे: किरीट सोमय्या

हे ईडीचे तिसरे समन्स आहे. पण संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत यांचे कुटुंब दूर का पळत आहे: किरीट सोमय्या

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. त्यानंतर त्यांना आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे देण्यात आले होते. मात्र चौकशीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ हवा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ५ जानेवारीपर्यंतची वेळ मागितल्याचं समजतंय. यावरुन आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. 

हे ईडीचे तिसरे समन्स आहे. पण संजय राऊत यांचे कुटुंब ईडी समोर येत नाही.  संजय राऊत परिवार, प्रवीण राऊत परिवाराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा कुठून आला? कॅश ट्रेल, मनी ट्रेल पीएमसी बँकेचा एचडीआयएलच्या मार्गाने पैसा कुठून कुठं गेला? याचा तपास तर व्हायलाच हवा, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसंच संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या परिवारात काय खास नातं आहे? असं देखील किरीट सोमय्या यांनी विचारणा केली आहे.  किरीट सोमय्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

तसंच  एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून राऊत परिवाराला किती रक्कम मिळाली? एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ५ हजार ४०० कोटी चोरले आहे. पीएमसीसाठी हे महत्वाचे आहे,  असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊतांची ईडी आणि भाजपवर टीका

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नसल्याचा इशारा राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे. तसंच ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा-  मैं जब भी बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ: संजय राऊत

मी अद्याप नोटिस पाहिलेली नाही. नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ, असंही त्यांनी सांगितलं. ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो, असंही बोलायला राऊत विसरले नाहीत. 

हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं म्हणत देशात आजही कायदा असून त्याचा सन्मान केला पाहिजे. देशात सध्या इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 Sanjay raut varsha ed notice kirit somaiya tweet raut family running away

loading image