esakal | कोश्यारी विरुद्ध ठाकरे सामना; फायरब्रँड नेते संजय राऊत म्हणतात "मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे ऐतिहासिक दस्ताऐवज"
sakal

बोलून बातमी शोधा

कोश्यारी विरुद्ध ठाकरे सामना; फायरब्रँड नेते संजय राऊत म्हणतात "मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे ऐतिहासिक दस्ताऐवज"

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सामन्यावर कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

कोश्यारी विरुद्ध ठाकरे सामना; फायरब्रँड नेते संजय राऊत म्हणतात "मुख्यमंत्र्यांचं उत्तर म्हणजे ऐतिहासिक दस्ताऐवज"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महाराष्ट्राचं गरमागरमीचं राजकीय वातावरण. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा महाराष्ट्राला आल्याचं आज पाहायला मिळतंय. राजकीय गरमागरमीचं आजचं करणं म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील मंदिरं खुली करण्यासाठीचा पत्रव्यवहार.

महाराष्ट्रातील बार आणि रेस्टॉरंट्स खुले करण्यात आलेले आहेत, मग राज्यातील देवस्थानं बंद कशासाठी? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून विचारलाय. तर आपल्याला कुणीही हिंदुत्त्व शिकवण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिली आहे. 

महत्त्वाची बातमी : अनिल परब यांना तातडीने लिलावतीमध्ये हलवलं, मुख्यमंत्र्यांनी रद्द केली मातोश्रीवरील बैठक

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सामन्यावर कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. संजय राऊत म्हणालेत की, आमचे हिंदुत्व पक्के आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आम्हाला कुणी हिंदुत्वाबद्दल शिकवू नये किंवा त्याचे धडे देऊ नये. महाराष्ट्राचे राज्यपाल इंग्रजीमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात. त्या इंग्रजी पत्राला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परखड अशा ठाकरी भाषेत उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला, राज्यपालांना कोणतंही आकांडतांडव न करता अगदी सुस्पष्ट आणि विनम्रतेने कसं उत्तर द्यावं याचा एक परिपाठ, माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शालीनतेने, हिंदुत्त्वाच्या, घटनेच्या सर्व मर्यादा पाळून त्यांना उत्तर दिलेलं आहे. यावर फार चर्चा होऊ नये. राज्यपाल या आदर्णीय व्यक्ती आहेत आणि त्यांचा आम्हाला सन्मान आहे. 

sanjay raut vs uddhav thackeray on opening temples sanjay rauts comment