संजय राऊत शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या विधानावर म्हणतात, पवारांचे विधान कधीही...

संजय राऊत शरद पवारांच्या पार्थ यांच्याबद्दलच्या विधानावर म्हणतात, पवारांचे विधान कधीही...

मुंबई : शरद पवारांचे विधान निरर्थक नसते, पवार म्हणाले की, मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही सीआयए, केजीबी, मोसादकडून तपास करावा, त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमाना दिली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. त्यावर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. राऊत म्हणाले, शरद पवार यांनी भूमिका घेतल्यास त्यावर मिडियाने चिंता करायची गरज नाही. पवारांचे विधान निरर्थक नसते, पवार साहेबांनी असं सांगितलंय की, मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे. तुम्ही सीआयए, केजीबी, मोसादकडून तपास करावा, त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेले नाही.

या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव कुठंही येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोठ्या कुटुंबातील नाव घेवून सनसनाटी निर्माण केली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले, पार्थ पवार यांच्या भूमिकेवर मी काय बोलणार? त्यावर त्यांचे सर्वोच्च नेते बोलले आहेत, असे सांगत पार्थ पवार यांच्या प्रकरणावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

सीबीआय प्रकरणी बोलताना ते म्हणाले, राज्यांच्या अधिकारांवर हे अतिक्रमण आहे,मात्र आम्ही घाबरणारे आहोत का, आम्ही गुडघे टेकणारे नाही, गुडघे फोडणारे आहोत, असेही राऊत यांनी सांगितले.

...म्हणून आदित्य ठाकरे यांना मान : राऊत

पद्म पुरस्कार समितीवर इतर पक्षाचेही सदस्य आहेत. विरोधकांनीही शिफारशी पाठवाव्यात. पात्रता कोण ठरवणार, त्यावर समुद्रमंथन करावे लागेल. ते कॅबिनेटचे सदस्य असल्याने त्यांना मान दिला असल्याचे राऊत म्हणाले.

सगळे पूल व्यवस्थित आहे, पाऊस कमी आहे. हे सरकार पाच वर्षे टिकणार. आम्हाला दोघांनाही काही काम नाही. सरकार टिकवणे, पुढे ढकणे हे आमचे कामच आहे. जर कुणी स्वगृही परतत असेल तर स्वागत आहे. राज्याच्या राजकारणात चांगली गोष्ट आहे. 170 आमदार पाठिशी आहेत, यापेक्षा आमदारांची सध्या गरज नाही, असे म्हणत सरकार मजबूत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

पवार यांना सीबीआय चौकशी हवी : ऍड.शेलार

शरद पवार यांना हे प्रकरण सीबीआयकडे देणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे, अशी माहिती भाजपनेते ऍड आशिष यांनी दिली. शेलार म्हणाले की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांची क्षमतेवर नाही तर तपासाच्या दिशेवर प्रश्न आहे.

त्यामुळे सीबीआय चौकशी व्हावी ही आमची आग्रही भूमिका आहे. सीबीआय चौकशीची योग्य मागणी पार्थ पवार यांनी केली, आमचा त्याला पाठिंबाच आहे. तसेच शरद पवार यांच्या वक्तव्यात अंतिमतः ते सीबीआय चौकशी नाकारण्याचे कारण नाही असे ते म्हणत आहेत. याचा गर्भित अर्थ त्यांचा सीबीआय चौकशीला समर्थनच आहे असे आम्ही समजतो. 'देर आए, दुरुस्त आए', त्यामुळे आता तरी त्यांच्या सरकारने आणि गृह मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात हीच भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेवरुन महाविकास अघाडित कुरघोडी सुरु आहे हे स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये सीबीआय चौकशीला विरोध एक पक्ष करतोय की सरकार करतेय हा खरा संभ्रम आहे. कुठले ही वक्तव्य करून "मै हू ना" हे दाखवण्याची वेळ जयंत पाटलांवर आलेली आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याखेरीज त्यांना पर्याय नाही. भाजप यामध्ये कुठलीही राजकीय संधी बघत नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात न्याय मिळावा हीच आमची भूमिका, असल्याचे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.

( संपादन - सुमित बागुल )

sanjay rauts comment on sharad pawars comment about parth pawar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com