कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; संजय राऊतांचा सूर नरमला

समीर सुर्वे
Thursday, 10 September 2020

अभिनेत्री कंगणा राणावत चा विषय आमच्यासाठी संपला असून आता आम्ही आमच्या दैनंदिन कामात व्यस्त आहोत.

मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावत चा विषय आमच्यासाठी संपला असून आता आम्ही आमच्या दैनंदिन कामात व्यस्त आहोत.अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले.

कंगनाने शरद पवार यांचे नाव घेताच, जितेंद्र आव्हाड भडकले, म्हटले की,...

कंगणाच्या व्यक्तव्यांना महत्व न देता प्रतिक्रीया देऊ नका असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिले होते.त्यानंतर आज राऊत यांनी मातोश्री येथे जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.ही भेट पक्षाच्या कामानिमीत्त असल्याचे राऊत यांनी सांगितले.

कंगनाच्या बंगल्यावर आकसाने कारवाई नाही; मुंबई महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण

या प्रकरणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा होती.मात्र,राऊत यांनी दोघेही नाराज नसल्याचे सांगितले.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Rauts tone softened about kangana ranaut