Sanjay Shirsat : राज्यात सव्वाशे वसतिगृहे सुरू करणार : संजय शिरसाट; पंधराशे कोटी रुपयांचा निधी राखीव
Mumbai Legislative Assembly : विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा दर्जा सुधारण्यात येत आहे. तेथील स्वयंपाकगृहांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
मुंबई : वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचे उद्दिष्ट असून यासाठी राज्याच्या विविध भागात सामाजिक न्याय विभाग सव्वाशे वसतिगृहे सुरू करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरात दिली.