फडणवीसांना आणखीन एक धक्का, महाविकास आघाडीने केली 'ही' नियुक्ती रद्द..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मुंबई - महाराष्ट्रात भाजपाला एकवार एक धक्का बसताना पाहायला मिळतोय. असाच आणखीन एक धक्का महाविकास आघाडीकडून भाजपाला देण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळावरून संजय उपाध्याय यांची नियुक्ती आता रद्द करण्यात आलेली आहे. संजय उपाध्याय हे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण विकास महामंडळ उपाध्यक्षपदावर कार्यरत होते. संजय उपाध्याय हे भाजपचे नेते आहेतच, मात्र देवेंद्र फडणीस याचे देखील निकटवर्तीय आहेत.  

मोठी बातमी - चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी संजय उपाध्याय यांची नियुक्ती 'म्हाडा'वर केली होती. तसंच त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आलेला. दरम्यान, आता महाविकास आघाडीचं नेतृत्त्व करणाऱ्या 'ठाकरे' सरकारने संजय उपाध्याय यांची नियुक्ती रद्द केली आहे. 

मोठी बातमी - गृहमंत्रालयाकडून मुंबई कमिशनर संजय बर्वेंना समन्स, जाणून घ्या 'संपूर्ण' प्रकरण...

थेट सरपंच निवडीपासून ते अगदी बुलेट ट्रेनपर्यंत, महाविकास आघाडीच्या सरकारने फडणवीसांच्या काळात घेण्यात येणाऱ्या निर्णयांना केराची टोपली दाखवलीय. फडणवीसांच्या काळात करण्यात आलेल्या अनेक नियुक्त्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. अशात आज घेण्यात आलेला निर्णय म्हणजे फडणवीसांसाठी आणखीन एक धक्का मानला जातोय. 

sanjay upadhyay is no more mhada vice president mahavikas aaghadi canceled his appointment 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay upadhyay is no more mhada vice president mahavikas aaghadi canceled his appointment