चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मुंबई : अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील लेडीज टेलरच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये (कपडे बदलण्याची खोली) छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे समोर आलेल्या या प्रकरणात संबंधित टेलरला ओशिवरा पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

हेही वाचा - पोलिस खबऱ्याचा तरुणीवर बलात्कार

मुंबई : अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील लेडीज टेलरच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये (कपडे बदलण्याची खोली) छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका तरुणीच्या सतर्कतेमुळे समोर आलेल्या या प्रकरणात संबंधित टेलरला ओशिवरा पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. 

हेही वाचा - पोलिस खबऱ्याचा तरुणीवर बलात्कार

अंधेरीतील लोखंडवाला परिसरात शेहनवाज सज्जाद हुसेन याचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. या दुकानातील ट्रायल रूममध्ये लपवलेल्या मोबाईल कॅमेऱ्यातून चित्रीकरण केले जात होते. तक्रारदार विवाहितेला तिच्या एका मैत्रिणीने या लेडीज टेलरची माहिती दिली होती. यापूर्वीही तिने या टेलरकडून ड्रेस शिवून घेतला असल्याने 2 फेब्रुवारीला तिने पुन्हा कपडे शिवायला दिले होते. शिवलेले कपडे घेण्यासाठी ही तरुणी हुसेन यांच्या दुकानात आली. त्या वेळी त्याने तिला दुकानाच्या पोटमाळ्यावरील ट्रायल रूममध्ये जाऊन ड्रेस ट्राय करून पाहण्यास सांगितले. 

त्यानुसार ती कपडे बदलण्यासाठी पोटमाळ्यावरील खोलीत गेली. कपडे बदलून झाल्यानंतर तिची नजर खिळ्याला अडकवलेल्या पिशवीकडे गेली. त्या पिशवीत एक मोबाईल लपवलेला तिला दिसला. पिशवीत लपवलेला मोबाईल काढून पहिल्यावर तिला मोठा धक्का बसला. त्या मोबाईलमधील कॅमेऱ्यात तिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण असल्याचे आढळले. त्यानंतर तिने जाब विचारला असता हुसेन उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. 

हेही वाचा - उर्वशी चुडावालाला अटकेपासून दिलासा

या प्रकाराची माहिती तिने मैत्रीण आणि कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्या टेलरच्या दुकानाकडे धाव घेतली. कुटुंबीय तेथे पोहोचताच या तरुणीने हुसेनला कॉलर पकडून ओशिवरा पोलिस ठाण्यात नेले. तिने पोलिसांना त्याच्या कृत्याची माहिती देऊन तक्रार नोंदवली. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी हुसेनच्या दुकानातील ट्रायल रूममध्ये लपवलेला मोबाईल तपासला. त्या वेळी या महिलेचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण असल्याचे आढळले. 

न्यायालयाकडून जामीन 
याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम क्र. 354 (क) अंतर्गत गुन्हा नोंदवून हुसेन याला अटक केल्याची माहिती ओशिवरा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली. त्याच्या मोबाईलमध्ये आणखी एका महिलेचे चित्रीकरण असल्याचेही उघड झाले. स्थानिक न्यायालयाने आरोपीला जामीन दिला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Hidden camera in the changing room! Ladies Taylor arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hidden camera in the changing room! Ladies Taylor arrested