
'तुका झालासे कळस, भजन करा सावकास।', 'बहेणि फडकती ध्वजा। निरुपण केले वोजा' असे सांगत संत बहिणबाई यांनी वारकरी पंथाची ध्वजा विश्वात फडकवली. त्यांनी केवळ अंभग रचना केल्या नाहीत तर संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतमधील ग्रंथाचे मराठीत भाषांतर करणाऱ्या पहिल्या स्त्री संत म्हणून देखील त्यांची नोंद होते. संस्कृतवर मोठा प्रभाव असलेल्या मराठीतील त्या एकमेव महिला संत होत्या असे संशोधकांनी नमूद केले आहे.
संत बहिणाबाई यांच्या अभंगरचनेवर संशोधकांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. ती सुमारे साडेसातशे असावी असे अनेकांना वाटते. मात्र, आजमितीला त्यातील ७२५ अभंग उपलब्ध आहेत. तर संत बाहिणावाई यांनी 'एक लक्ष चोपन हजार' अभंग केले असावेत, असा अंदाज 'संत बहिणाबाईंची गाथा'मध्ये वि.ना. कोल्हारकर यांनी व्यक्त केला आहे.
मात्र त्यातील असंख्य रचना आजही उपलब्ध होऊ शकल्या नसल्याचे काही संशोधकांचे म्हणणे आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. म्हणतात, संत तुकारामांकडून बहिणाबाई यांना एकाच वेळी शिष्यत्व तर मिळालेच त्यासोबत मंत्रोपदेश आणि कवित्वाची स्फूर्ती मिळाली असे भाग्य इतर कोणत्याही संताला मिळाले नाही, असेही डॉ. मोरे म्हणाले.