
मुंबई : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड विस्तारित भाग असलेल्या वाकोला येथील केबल स्टे ब्रीजचे काम पूर्ण झाले. पश्चिम द्रुतगती मार्गाला ओलंडणा-या या १०० मीटर लांबीच्या वक्राकार पुलाच्या खाली लावलेली तात्पुरती आधाररचना हटवण्याचे काम सुरू आहे. तसेच पुलाच्या खांबाचे रंगकाम आणि सौंदर्यीकरणाची कामे जलद गतीने सुरू आहेत. या पुलामुळे पूर्व-पश्चिम उपनगराला जोडणारी वाहतूक वेगवान होणार असल्याने वाहनाधारकांना आता हा पूल कधी सुरू होणार याची प्रतिक्षा लागली आहे.