सरनाईक पिता-पुत्राला ईडीकडून समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

पूजा विचारे
Tuesday, 1 December 2020

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेत. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना हा समन्स बजावलेत. तसंच प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीनं समन्स बजावला आहे.

मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेत. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना हा समन्स बजावलेत. तसंच प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीनं समन्स बजावला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. तर खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी दोघंही चौकशीसाठी हजर राहण्याची माहिती मिळतेय. ईडीच्या समन्सला अद्याप सरनाईक पिता पुत्रानी काही उत्तर न दिल्याचंही समजतंय. 

आज प्रताप सरनाईक यांचा क्वांरटाईनचा कालावधीही संपणार आहे. २५ नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. यात त्यांनी त्यांचे दोन्ही मुलं विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही छापे मारले होते. छापेमारीच्या दिवशी ईडीनं विहंगची पाच तास चौकशी केली.  प्रताप सरनाईक मुंबईच्या बाहेर होते. मुंबई बाहेरुन आल्यानं सरनाईक क्वांरटाईन झाले. तर त्यात विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नसून पुढच्या आठवड्यात चौकशीला उपस्थित राहण्याची विनंती सरनाईक यांनी ईडील कळवलं होतं. 

अधिक वाचा-  नेस्को जंम्बो कोविड केंद्रात पोस्ट कोविड ओपीडी सुरु, रुग्णांना दिलासा

आज प्रताप सरनाईक यांचं क्वांरटाईन संपलं आहे. त्यामुळे ईडीनं पुन्हा एकदा त्यांना समन्स जारी केला आहे. यात चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. 

अमित चांदोळे यांना न्यायालयीन कोठडी

टॉप ग्रुप प्रकरणी तपास करणा-या सक्त वसुली संचलनालय(ईडी) अटक केलेले अमित चांदोळे यांना न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.  चांदोळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा निकटवर्तीय मानले जातात.

अधिक वाचा-  चक्क लाच म्हणून अधिकाऱ्याने मागितल्या दोन साड्या, ACB कडून गुन्हा दाखल

लंडन येथील मालमत्तांप्रकरणी ईडी चांदोळे यांची 12 तास चौकशी केल्यानंतर 25 नोव्हेंबरला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा(पीएमएलए) कलम 3 आणि 4 अंतर्गत त्यांना ईडीने अटक केली होती. याप्रकरणी रविवारी न्यायालयाने त्यांना डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेत. टॉप ग्रुपला मिळालेल्या एमएमआरडीएच्या कंत्राटात गैरव्यवहार करून त्यातील दरमहिना सहा लाख रुपये त्यांना मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई आणि ठाण्यातील 10 ठिकाणी शोध मोहिम राबवली होती. त्यात चांदोळेच्या संबंधित ठिकाणाचाही सहभाग होता. याप्रकरणी ईडीच्या रडावर आलेल्या व्यावसायिक देवाण-घेवाणीबाबतची माहिती चांदोळेला असल्याचा संशय आहे.

Sarnaik father-son summoned by ED ordered to appear for interrogation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarnaik father-son summoned by ED ordered to appear for interrogation