नेस्को जंम्बो कोविड केंद्रात पोस्ट कोविड ओपीडी सुरु, रुग्णांना दिलासा

भाग्यश्री भुवड
Tuesday, 1 December 2020

नेस्को जंम्बो कोविड केंद्रात आजपासून पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. पोस्ट कोविड उद्भवणाऱ्या समस्यांबाबत या ओपीडीत रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई: नेस्को जंम्बो कोविड केंद्रात आजपासून पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. पोस्ट कोविड उद्भवणाऱ्या समस्यांबाबत या ओपीडीत रुग्णांना दिलासा मिळणार आहे. पहिल्या दिवशी 5 जणांवर या पोस्ट कोविड ओपीडीत उपचार केले गेले असल्याची माहिती नेस्कोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे. 

कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोनावर मात केलेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी नायर आणि केईएम रुग्णालयात पोस्ट ओपीडी याआधीच सुरु करण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता आता गोरेगाव येथील नेस्को जंम्बो कोविड सेंटरमध्ये पोस्ट ओपीडी सुरु करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, नेस्कोच्या पोस्ट ओपीडीत फुफ्फुसांचा व्यायाम आणि फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाईल. ज्यासाठी केंद्रात आवश्यक उपकरणे खरेदी करण्यात येतील, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा-  मध्य वैतरणात बीएमसीचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प; राज्यातील पहिलाच प्रयोग

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे सुरुवातीला जंम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्यात येत होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जंम्बो कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली. त्यानंतर नेस्को जंम्बो कोविड सेंटर मध्ये आवाज चाचणीचे नमुने घेण्यास सुरुवात केली. आवाज चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी खाटा रिक्त पडल्या आहेत. त्यामुळे, या ठिकाणी पोस्ट ओपीडी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ओपीडी तत्त्वावर रूग्णांना तपासण्यासाठी केईएम आणि कूपर रूग्णालयाच्या तज्ज्ञांना बोलवण्याच्या विचारात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिक वाचा-  रद्द विमानप्रवास, सहलींचा परतावा साह्यासाठी, ग्राहक पंचायत सज्ज! प्रवाशांना मार्गदर्शक पत्रके जारी

बरेच बरे झालेल्या कोविड -19 रूग्णांमध्ये दीर्घकाळापर्यंत राहणारी गुंतागुंत तयार झाली आहे. जसे की श्वास, थकवा, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, फुफ्फुसातील फायब्रोसिस, हृदयरोग आणि इतर अवयवांमध्ये सुन्नपणा. यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार देखील पडतो कारण रुग्णांना अनेक महिने उपचार घ्यावे लागतात. त्यामूळे, आता नेस्कोच्या कोविड केंद्रात ही पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली असून 5 जणांवर उपचार केले गेले आहेत.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Post Covid OPD starts from today at Nesco Jumbo Covid Center Patients are relieved


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Post Covid OPD starts from today at Nesco Jumbo Covid Center Patients are relieved