Mumbai: मुंबईत गुंजला गावचा आवाज! ‘पंचायत मॉडेल’चा मुंबईत डंका, सरपंचांनी शिकवला हवामान संकटाशी लढण्याचा धडा

Mumbai Climate Week : ‘मुंबई क्लायमेट वीक' येथे सहा राज्यांतील सरपंचांनी हजेरी लावली. यावेळी क्लायमेट चेंजचा मुकाबला करण्यासाठी गावपातळीवर ‘बेला’ किंवा ‘पेरिंजनम’सारखी मॉडेल हवी, असे त्यांनी म्हटले.
Climate Change

Climate Change

ESakal

Updated on

​मुंबई : आलिशान कॉर्पोरेट कार्यालये आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचे केंद्र असलेल्या मुंबईतील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये बुधवारी भारताच्या तळागाळातील नेतृत्वाचा आवाज घुमला. निमित्त होते ‘मुंबई क्लायमेट वीक’अंतर्गत आयोजित ‘पंचायत’ सत्राचे. जागतिक हवामान बदलाचा (क्लायमेट चेंज) मुकाबला करण्यासाठी केवळ मोठमोठ्या घोषणा नकोत, तर गावपातळीवर ‘बेला’ किंवा ‘पेरिंजनम’सारखी मॉडेल हवीत, असा संदेश महाराष्ट्र, केरळ आणि ओडिशासह सहा राज्यांतील सरपंचांनी मुंबईतून जगाला दिला. ​असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायजर्स आणि पीडीएजी यांच्या सहकार्याने आयोजित या सत्रात, हवामान बदलाचे संकट पेलण्यासाठी मुंबईत सुरू असलेल्या चर्चेला ग्रामीण भारताच्या प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com