Satish Uke Arrest | 'फडणवीसांच्या सहकार्याने मला...' युक्तीवाद करताना सतीश उकेंना अश्रू अनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish uke

'फडणवीसांच्या सहकार्याने मला...' युक्तीवाद करताना सतीश उकेंना अश्रू अनावर

जमीन व्यवहारांप्रकरणी ईडीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंना अटक करण्यात आली. त्यांना पहाटेच नागपुरातील घरातून ताब्यात घेण्यात आलं. ईडीचं पथक सकाळीच नागपुरात पोहोचलं आणि धडक कारवाईला सुरुवात झाली. एका जमीनीच्या प्रकणात ही कारवाई झाली. (Satish Uke Arrested by ED)

दरम्यान त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून त्यांना मुंबईत कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी युक्तीवाद करत असताना त्यांनी फडणवीसांच्या विरोधात केस लढल्याचं सांगितलं. माझ्यावर जस्टीस लोया प्रकरणातही दबाव आणण्यात आला, असं उके म्हणाले.

हेही वाचा: जमीन व्यवहारांप्रकरणी नाना पटोले यांचे वकील उकेंना ईडीकडून अटक

आधी छापा...मग समन्स!

सतीश उके हे विविध राजकीय नेत्यांच्या केसेस लढत आहेत. उके यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना का अटक करण्यात आले, याची माहिती देण्यात आली नाही, असं उकेंच्या वकिलांनी सांगितलं.

कायद्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी हे करणे गरजेचे आहे. समन्स 10.30 वाजता पाठवण्यात आले. त्याआधीच छापेमारी करण्यात आली. टेक्निकली त्यांना सकाळी 6.30 वाजताच अटक झाली होती. अजून ही अटक कोणत्या ग्राउंडवर आहे, याची उके किंवा त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नाही, असं उकेंच्या वकिलांनी म्हटलं.

आम्हाला नोटीस का देण्यात आली नाही. थेट छापेमारी करून समन्स देण्यात आले. छापेमारीसाठी पोलिसांची मदत न घेता थेट सीआरपीएफची मदत घेतली गेली. जणू उके हे दहशतवादी किंवा गुन्हेगार असल्याचे भासवले, असा युक्तीवाद करण्यात आला.

हेही वाचा: सतीश उकेंवरील मूळ कारवाई नागपूर पोलिसांची : फडणवीस

झोपेत असताना एके ४७ घेऊन गार्ड आले

यानंतर उके यांनी स्वत: युक्तीवाद केला. मी झोपेत असताना माझ्या बेडरूम मध्ये सीआरपीएफचे जवान AK47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. अशा वेळी घरात घुसून कारवाई करण्यात आली. मी आधी आर्किटेक्ट होतो. नंतर कायद्याचं शिक्षण घेऊन 2007 साली वकिली सुरू केली. मी फडणवीस, गडकरी यांच्या विरोधात खटले लढले.

माझ्यावर लोया यांच्या केसमध्ये दबाव टाकला गेला. फडणवीस यांच्या सहकार्याने मला धमकावले, असं उके बोलू लागले. यानंतर ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले.

मला ताब्यात घेताना सांगण्यात आले नाही कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले जात आहे. 2016 मध्ये लोयांची केस हाताळताना माझावर हल्ला झाला मी पोलीस तक्रार केली पण घेतली नाही. माझा कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती उके यांनी दिली.

Web Title: Satish Uke Became Emotional During Curt Proceedings After Ed Arrest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nana Patole
go to top