

First Oil Tanker Reaches Mumbai After Crossing Tense Hormuz Strait
esakal
मुंबई : सौदी अरेबियाहून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल घेऊन निघालेल्या लायबेरियाच्या ध्वजाखालील ‘शेनलोंग सुएझमॅक्स’ या तेलवाहू जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या ओलांडून मुंबई बंदरात सुरक्षितपणे आगमन केले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सागरी मार्गावर उद्भवलेल्या गंभीर अडथळ्यांना सामोरे जाऊन पश्चिम आशियातील सुमारे तीस लाख बॅरल कच्च्या तेलाची वाहतूक करणारी दोन जहाजे भारतात पोहोचली आहेत. याशिवाय ‘पुष्पक’ आणि ‘परिमल’ या दोन अतिरिक्त जहाजे सध्या भारताच्या दिशेने प्रवास करत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक पूर्वीसारखी सुरळीत झाल्यास भविष्यात आणखी अनेक तेलवाहू जहाजे भारताच्या बंदरांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.