
अल्पवयीन मुलीला 'आ जा, आ जा' म्हणणे हा लैंगिक छळ; न्यायालयाचा निर्णय
मुंबई : अल्पवयीन मुलीला आजा आजा म्हटल्याने एका व्यक्तीला एका वर्षाची शिक्षा सुनावल्याची घटना मुंबई येथे घडली आहे. मुंबई येथील दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तब्बल ८ वर्षानंतर कोर्टाने हा निर्णय दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली आरोपीला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...
अधिक माहितीनुसार, २०१५ मध्ये अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपीविरोधात तक्रार नोंदवली होती. ही घटना १ सप्टेंबर २०१५ रोजी घडली होती. मुलगी शाळेतून परत आल्यानंतर क्लाससाठी जात होती. त्यावेळी रस्त्यामध्ये आरोपीने तिला अडवले आणि 'आजा आजा' असं म्हणाला. यानंतर मुलीने घाबरून मदतीसाठी आरडोओरडा केला. त्यावेळी लोक जमा होण्याच्या भितीने आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आरोपीने मी दोषी नसल्याचं सांगून त्याच्यावर लावलेले सर्व आरोप नाकारले होते. पण या प्रकरणावर निकाल देताना 'आजा आजा' म्हणणे हा लैंगिक छळ असल्याचं कोर्टाने सिद्ध केलं आणि आरोपीला दोषी ठरवत न्यायलयाने एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे.