esakal | 'या' मांजरामुळे पोलिसांनी केली त्याला अटक!
sakal

बोलून बातमी शोधा

'या' मांजरामुळे पोलिसांनी केली त्याला अटक!

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यास खांदेश्‍वर पोलिसांनी सोमवारी सापळा रचून अटक केली आहे. कल्पेश गणपत जाधव (28) असे आरोपीचे नाव आहे.

'या' मांजरामुळे पोलिसांनी केली त्याला अटक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यास खांदेश्‍वर पोलिसांनी सोमवारी सापळा रचून अटक केली आहे. कल्पेश गणपत जाधव (28) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम आसूडगाव येथे खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खांदेश्‍वर पोलिसांनी आसुडगाव येथे सापळा रचून आरोपी कल्पेश गणपत जाधव वय 28 वर्षे याला ताब्यात घेतले. 

ही बातमी वाचली का? शिक्षक संपावर, विद्यार्थी वर्गावर...

कल्पेशच्या वाहनाची तपासणी करत असताना पोलिसांना लाल रंगाच्या टाटा सुमोमध्ये खवले मांजर ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्याचे वजन किमान 7 किलो 360 ग्रॅम असे होते. आरोपीला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने हे खवले मंजर तस्करीकरिता आणले असल्याची कबुली दिली. 

ही बातमी वाचली का? हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग ठरतोय घातक; वाचा का ते...

या जातीचे मांजर जवळ बाळगल्यास धनदौलत व ऐश्‍वर्य मिळते, असा लोकांचा गैरसमज आहे. त्यासाठीच तस्करी केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

loading image