esakal | हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग ठरतोय 'घातक'; वाचा का 'ते'...
sakal

बोलून बातमी शोधा

हार्बर मार्ग, ट्रान्सहार्बर ठरतोय 'घातक'; वाचा का 'ते'...

ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर पनवेल व वाशी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी सन 2019 मधील वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये 247 प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत.

हार्बर, ट्रान्सहार्बर मार्ग ठरतोय 'घातक'; वाचा का 'ते'...

sakal_logo
By
शरद वागदरे

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर पनवेल व वाशी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी सन 2019 मधील वर्षभरात घडलेल्या अपघातांमध्ये 247 प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करताना झाले. रेल्वे रूळ ओलांडण्यावर प्रतिबंध असतानाही लवकर पोहोचण्याच्या प्रयत्नात प्रवाशांकडून जीव मुठीत धरून रूळ ओलांडले जात आहेत. सन 2018 मध्ये 251 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. त्या तुलनेत या वर्षी रेल्वे अपघात चारने घट झाली आहे. 

ही बातमी वाचली का? पोलिसाच्या धाकाने सई ताम्हणकरने गायलं गाणं.. 

नवी मुंबईत ट्रान्स हार्बर तसेच हार्बर रेल्वे मार्गाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रश्‍न मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेला आहे. जागोजागी रेल्वेरूळ ओलांडण्याचे शॉर्टकट तयार झाले आहेत. स्थानकाचा प्रवेशद्वार मार्ग न वापरता थेट फलाटावर ये-जा करण्यासाठी अथवा रुळाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जीव धोक्‍यात घातला जात आहे. अशा ठिकाणावरून रेल्वे प्रवाशांकडून दिवस-रात्र रूळ ओलांडले जात आहेत. अशा वेळी वेगवान रेल्वेची धडक लागून प्रवासी मरण पावण्याचे अथवा जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. 

ही बातमी वाचली का? 'हा' कांदा आलाय बाजारात; त्याचे आहेत औषधी गुणधर्म..

त्यानुसार सन 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत वाशी व पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एकूण 247 रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी 78 प्राणांतिक अपघात पनवेल रेल्वे पोलिसांच्या हद्दीत बेलापूर ते पनवेल व पनवेल ते कळंबोलीदरम्यान घडले आहेत; तर उर्वरित 169 मृत्यू हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सीवूडस्‌ ते गोवंडी व वाशी ते ऐरोलीदरम्यान घडले आहेत. वाशी व पनवेल रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांत 498 जणांना रेल्वे अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

ही बातमी वाचली का? मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलविले

रेल्वे प्रवाशांकडून जीव धोक्‍यात घालून रूळ ओलांडले जाऊ नयेत यासाठी जनजागृती करण्यात येते. तरीदेखील रेल्वे प्रवशांकडून घाईत जाण्याच्या नादात रेल्वे रूळ ओलांडले जात आहेत. रेल्वे वेळ ओलांडताना भेटल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. 
- नंदकिशोर सस्ते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाशी (रेल्वे). 

loading image
go to top