

School bus strike Maharashtra
ESakal
मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर स्कूल बसचालक- मालक संघटनेने ५ मार्चपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. पुढील सात दिवसांत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास बससेवा बंद ठेवण्यात येईल, असे संघटनेने प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.