Mumbai: 'शाळा संचालकाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल'; कल्याणमधील घटना; अनेक दिवसांपासून प्रकार सुरू, नेमकं काय घडलं..
अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू असून, केवळ एखादा प्रकार नाही, तर असे तीन ते चार व्हिडिओ समोर आले आहेत. कल्याण परिमंडळ ३चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे म्हणाले, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून याची चौकशी सुरू आहे.
Kalyan: Obscene video of school director goes viral, sparking outrage and FIR demands from parents.Sakal
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील एका नामांकित खासगी शाळेच्या संचालकाचा अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालकांनी थेट कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत संबंधित संचालकाविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.