
Marathi
ESakal
मुंबई : ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा आणि शाळेला अत्यंत चांगले दिवस येणे अपेक्षित होते; परंतु राज्य शासनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. यामुळे राज्यातील मराठी शाळांची वस्तुस्थिती लक्षात येण्यासाठी राज्य सरकारने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी शनिवारी (ता. ११) केली.