esakal | शुल्क सवलतीवरून संस्थाचालकांची धाव राजभवनावर, घेणार राज्यपालांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

school fees

शुल्क सवलतीवरून संस्थाचालकांची धाव राजभवनावर, घेणार राज्यपालांची भेट

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्यातील खाजगी शाळांच्या (private school fees) शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा सरकारने (government) निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या विरोधात आता इंग्रजी शाळा (convent school) शिक्षण संस्थाचालक आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari ) यांची भेट घेणार आहेत. ( School owners will meet governor bhagat singh koshyari on fees issue-nss91)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला ग्राह्य मानून राज्य सरकारने राज्यातील खाजगी शाळांच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयासाठी सरकारने जर शुल्क अधिनियमात सुधारणा करण्याच्या नावाने अध्यादेश आणला तर त्याला आमचा विरोध असेल, सरकारचा एकूणच निर्णय हा अत्यंत चुकीचा असून त्यासाठी राज्यपालांकडे आम्ही गाऱ्हाणे मांडणार असल्याचे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनचे अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: कोविड नियमांचे पालन करुन यंदा लालबागच्या राजाचा दरबार सजणार

राज्यातील ज्याचे रोजगार गेले, जे पालक आर्थिक अडचणीत आलेले आहेत, त्यांना आम्ही यापूर्वीच 25 टक्के शुल्क सवलत दिली आहे. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे ज्याचे भरमसाठ पगार आहेत, जे आर्थिकदृष्टया सबळ आहेत, त्यांना याचा अधिक लाभ मिळणार आहे, त्यामुळे या निर्णयाला आपला विरोध असून त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटून सरकारच्या अध्यादेशावर आपला विरोध असल्याची भावना कळवनार असल्याचेही संजयराव तायडे-पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top