esakal | मुंबई: वर्तमानपत्राचे महत्त्व सांगणाऱ्या वह्यांची विद्यार्थ्यांना भेट | Newspaper
sakal

बोलून बातमी शोधा

Newspaper

मुंबई: वर्तमानपत्राचे महत्त्व सांगणाऱ्या वह्यांची विद्यार्थ्यांना भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना महामारीच्या (corona pandemic) सर्व नियमांचे पालन (corona rules) करत शाळा चालू करण्यात आल्या. इतके दिवस मुलांच्यात नैराश्याचे वातावरण होते; मात्र आज मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती (student attendance) लावली. या मुलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या (Newspaper selling team) वतीने डिलाईल रोड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) संचालित महाराष्ट्र हायस्कूलच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या वह्या भेट देण्यात आल्या.

हेही वाचा: दागिना बाजार येथे बंगाली बांधवांच्या रक्तदानाने ३११ युनिट रक्त संकलन

वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला देशातील, जगातील माहितीचे आकलन होते. त्याचबरोबर नेहमी वर्तमानपत्र वाचल्याने आपली शब्दसंपत्ती, ज्ञानकौशल्ये आणि सामाजिक जागृकता वाढण्यास मदत होते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचावे, असे आवाहन डॉ. प्रकाश पाटील यांनी या वेळी केले. या वेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र संघाचे विश्वस्त जीवन भोसले, शिवशाहू प्रतिष्ठानचे सचिव कृष्णा पाटील, संदीप चव्हाण व सम्राट चव्हाण आदी उपस्थित होते.

loading image
go to top