शाळांना फक्त पाच दिवसच दिवाळी सुट्टी, शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी

शाळांना फक्त पाच दिवसच दिवाळी सुट्टी, शिक्षक संघटनांकडून तीव्र नाराजी

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहेत. त्यामुळे उन्हाळी आणि गणेशोत्सवाच्या सुट्टीतही ऑनलाईन वर्ग सुरू होते. यंदा दिवाळीमध्ये मोठी सुट्टी मिळेल अशी अपेक्षा शिक्षक पालकांना होती. मात्र शिक्षण विभागाने केवळ 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत केवळ पाच दिवसच ऑनलाईन वर्गाला सुट्टी जाहीर केली आहे. या पाच दिवसामध्ये ऑनलाईन अध्यापन बंद राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांकडून जोरदार विरोध होऊ लागला असून हा निर्णय तातडीने बदलण्याची मागणी संघटनांनी केली आहे.

कोरोनाच्या कालावधीत ही शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू होते. दिवाळीमध्ये मोठी सुट्टी जाहीर करण्यात येईल, अशी अपेक्षा पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने 12 ते 16 नोव्हेंबरदरम्यान दिवाळी उत्सव असल्याने शाळांना फक्त पाच दिवसच सुट्टी जाहीर केली आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहणार आहे.

शाळांना पूर्वी दिवाळीची सुट्टी 21 दिवस होती. त्यांनतर वार्षिक सुट्ट्या 80 ऐवजी 76 करण्यात आल्याने शाळांची दिवाळी सुट्टी 18 दिवस करण्यात आली. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्टीसंदर्भात काढलेल्या परिपत्रकात ही सुट्टी पाच दिवस करण्यात आली आहे. शाळांना पाच दिवस सुट्टी जाहीर केल्याने दिवाळीची सुट्टी हळूहळू कमी करण्यात येत असल्याचा आरोप शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे.

18 सुट्ट्या मिळाव्यात

उन्हाळी सुट्टीमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू होते. गणपती सुट्टीतही ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे मुले आणि शिक्षक सतत मोबाईल आणि संगणकावर आहेत. त्यांना शाळांनी आपल्या अधिकारातील 76 पैकी 18 सुट्ट्यापूर्वीप्रमाणे देण्याचे नियोजन करावे अशी मागणी शिक्षक परिषद या संघटनेने शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
 
निरर्थक निर्णय

शालेय शिक्षण विभागाने दिवाळी सुट्टीबाबत घेतलेला निर्णय हा पूर्णपणे निरर्थक असून यापेक्षा निर्णय घेतलाच नसता तर बरे झाले असते. मुळात नियमानुसार 18 दिवस दिवाळी सुट्टी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती थोडीफार कमी अधिक समजू शकतो. हा निर्णय फक्त दिखावटीपणाचा आहे आणि जर विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असेल तर या दिवसांत ही ऑनलाईन अभ्यास घ्यायला मग काय हरकत आहे?

प्रशांत रेडीज, - सचिव- मुंबई मुख्याध्यापक संघटना

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Schools only five days Diwali holiday Outrage from teachers unions Demand change decision

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com