कोरोनाला रोखण्यासाठी 50-30 चा फॉर्म्युला? वैज्ञानिकांनी सुचवला हा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

जगभारत कोरोना व्हायरसनं घातलेलं थैमान लक्षात घेता या व्हायरसचं प्रमाण इतक्या लवकर कमी होईल अशी चिन्हं दिसत नाहीयेत.

मुंबई: जगभारत कोरोना व्हायरसनं घातलेलं थैमान लक्षात घेता या व्हायरसचं प्रमाण इतक्या लवकर कमी होईल अशी चिन्हं दिसत नाहीयेत. भारतातही कोरोना ग्रस्तांची संख्या तब्बल १ लाखाच्या पुढे गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय अशी वाढ होत चालली आहे. लस मिळतपर्यंत हे वातावरण असंच राहणार अशी शंका आता वैज्ञानिकांना येतेय म्हणूनच  वैज्ञानिकांनी यावर एक पर्याय सुचवला आहे. 

एक नाही दोन नाही तर तब्बल ३ लॉकडाऊननंतरही देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा आटोक्यात येत नाहीये. मात्र आता नागरिक या लॉकडाऊनला चांगलेच कंटाळले आहेत. किती दिवस असंच घरी राहणार आणि रोजगाराचं काय असे प्रश्न आता नागरिकांच्या मनात निर्माण व्हायला लागले आहेत. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही तोपर्यंत कोरोनाग्रस्त देशांनी काय करायला हवं याबद्दल काही पर्याय वैज्ञानिकांनी सुचवले आहेत.  

कोरोना.. जमावबंदी नव्हे तर साड्यांची खरेदी महत्वाची! पनवेलमध्ये घडला हा अजब प्रकार..

५० दिवस लॉकडाऊन तर ३० दिवस सूट: 

जोपर्यंत कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोविड-१९ या आजारावर लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत जगभरातल्या सर्व देशांनी ५० दिवस कठोर लॉकडाऊन तर ३० दिवस सोशल डिस्टंसिंगचे नियम वापरून सूट या फॉर्म्युल्याचा वापर करावा असा सल्ला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे भारतीय वंशांचे वैज्ञानिक राजीव चौधरी आणि त्यांच्या टीमनं दिला आहे. 

राजीव चौधरी यांच्या अभ्यासानुसार, सर्व कोरोनापीडित देशांनी या ५०-३० फॉर्म्युल्याचा अवलंब केला पाहिजे. ज्यात ५० दिवस संपूर्ण देश बंद ठेवणं आणि ३० दिवसांसाठी नागरिकांना सोशल डिस्टंसिंगचे नियम पाऊण संपूर्ण सुविधा देणं या दोन गोष्टी आहेत. हा ५०-३० फॉर्मुला सर्व देशांना कमीतकमी दीड वर्ष तरी लागू करावा लागणार आहे. 

हेही वाचा: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर, पण...

या फॉर्मुलामुळे कोरोनाग्रस्त लोकांची संख्याही कमी होईल आणि देशाची अर्थव्यवस्थाही चालत राहील. या फॉर्म्युल्याचा अवलंब केल्यामुळे जगात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण कमी होईल असं यूरोपियन जर्नल ऑफ इपीडीमिलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हंटलं आहे. 

त्यामुळे आता भारतातही हा फॉर्म्युला लागू करण्याबाबत सरकार विचार करेल का हे बघणं महत्वाचं असणार आहे. 

scientists suggested new 50-30 formula for controlling Corona read full story  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scientists suggested new 50-30 formula for controlling Corona read full story