बेस्ट उत्पन्न वाढीसाठीच्या शोधात; डिझेल विकण्यासोबतच खासगी चार्जिंग स्टेशन उभारणार

समीर सुर्वे
Saturday, 9 January 2021

तोट्यात असलेली बेस्ट उत्पन्न वाढीसाठी नवनवे मार्ग शोधणार आहे. त्यात, डिझेल विकण्याबरोबरच खासगी वाहनांच्या चार्जिगसाठी स्टेशन सुरु करण्याचा विचार पुढे आहे. अशा विविध पर्यायांचा विचार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई -: तोट्यात असलेली बेस्ट उत्पन्न वाढीसाठी नवनवे मार्ग शोधणार आहे. त्यात, डिझेल विकण्याबरोबरच खासगी वाहनांच्या चार्जिगसाठी स्टेशन सुरु करण्याचा विचार पुढे आहे. अशा विविध पर्यायांचा विचार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी(ता.7)महापालिका मुख्यालयात विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी बेस्टच्या आर्थिक परिस्थितीबाबतही चर्चा केली आहे. बेस्टचे 27 बसडेपो असून ते अत्यंत मोक्‍याच्या ठिकाणी आहे. या डेपोंचा व्यावसायिक वापर करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. त्या अंतर्गत कुर्ला येथील बस डेपोचा विकास करण्यात आला होता. मात्र,त्यात अपेक्षित यश आले नाही. सध्या बस डेपो मध्ये मोठ्या वाहानांच्या पार्किगची सोय उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यापुढे जाऊन बेस्टचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत विविध पर्याय पुढे आहे.भविष्यात ईलेक्‍ट्रीक वाहनांची संख्या वाढणार आहे.त्यामुळे बेस्टचे डेपोमध्ये चार्जिग पॉईंट तयार करण्याचा विचार पुढे आला आहे. त्याच बरोबर डेपो मधून खासगी वाहनांसाठी डिझेल विक्री करण्याचा विचार पुढे आला आहे. डिझेल विक्रीतून किमान लीटर मागे दोन ते तीन रुपयांचा फायदा होऊ शकले. "बेस्टचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध पर्यायांवर प्राथमिक चर्चा झाली आहे'.असे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यवशंत जाधव यांनी सांगितले.
बेस्टचे उत्पन्न वाढवून तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सल्लागार नेमण्याचा विचारही पुढे आले.तसेच,महापालिका आणि बेस्ट प्रशासनात समन्वय ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.  

In search of the best income growth Along with selling diesel, a private charging station will be set up

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In search of the best income growth Along with selling diesel, a private charging station will be set up