Dombivali News : मानपाडा-बाजारपेठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची खुर्ची गेले दोन महिने रिकामीच

ठाणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या असून पोलिसांनी नविन पदभार देखील हाती घेतले.
Manpada Police Station
Manpada Police Stationsakal

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या असून पोलिसांनी नविन पदभार देखील हाती घेतले आहेत. मात्र कल्याण परिमंडळ 3 मधील मानपाडा आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची खुर्ची मात्र गेले दोन महिने रिकामी आहे.

या पोलिस ठाण्याचा भार सध्या पोलिस निरीक्षकांच्या खांद्यावर देण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक निवृत्त झाले आहेत, तर मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे सक्तीच्या रजेवर गेले आहेत.

या पोलिस ठाण्यात दोन दोन पोलिस निरिक्षकांची पद भरत त्यांचा भार हलका करण्यात आला असला तरी या पोलिस ठाण्यांचे क्षेत्रफळ पाहता त्या ठिकाणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक असणे अत्यंत आवश्यक असताना ही पदे कधी भरली जातात हे पहावे लागेल.

कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत आठ पोलिस ठाणे येतात. यामध्ये डोंबिवली, विष्णूनगर, टिळ कनगर, मानपाडा, महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, बाजारपेठ, खडकपाडा या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाकडून पोलिसांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत.

डोंबिवली, विष्णूनगर व टिळकनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून नवनियुक्त पोलिस अधिकाऱ्यांनी या पोलिस ठाण्यांचा कार्यभार हाती घेतला आहे. विष्णूनगर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांची पदोन्नती होऊन त्यांची विष्णूनगरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डोंबिवली व टिळकनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन तेथे नितीन गिते व दत्तात्रय बोराटे यांची वरिष्ठ पोलिस निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बाजारपेठ व मानपाडा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांची खुर्ची सध्याच्या घडीला रिकामी आहे.

बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटील हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासून या पोलिस ठाण्यात वपोनि नाही. तर मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे हे जून महिन्याच्या सुरुवातीपासून सक्तीच्या रजेवर गेले आहेत. बाजारपेठ पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार पोलीस निरिक्षक सुनिल पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

तर मानपाडा पोलिस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार हा पोलिस निरीक्षक सुरेश मदने हे सांभाळत आहेत. या दोन्ही पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रामचंद्र चोपडे आणि विनोद कार्लेकर या नविन पोलिस निरिक्षकांची भरती करत पोलिस ठाण्यावर येणारा भार काहीसा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या विचारात घेता येथील पोलिस ठाण्यावरील ताण देखील वाढत आहे. कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत येणारे मानपाडा पोलिस ठाणे हे सर्वात मोठे ठाणे आहे. तब्बल 68 चौकिमी इतके क्षेत्रफळ या पोलिस ठाण्याचे आहे.

या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नव्याने मोठ्या गृहसंकुलांची उभारणी झाली असून अजूनही होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकरणात मोठी वाढ झाली आहे. तसेच कंपन्या, कामानिमित्त परराज्यातून येणाऱ्या नागिरकांचे वास्तव्य, हॉटेल्स, बार रेस्टॉरंटचे जाळे, ग्रामीण भाग याच पोलिस ठाण्यांतर्गत येते.

लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पोलिस कर्मचारी वर्गामुळे कायदा सुव्यवस्था राखणे येथे जिकिरीचे झाले आहे. सत्ताधारी पक्षातील दोन बड्या पक्षातील वादामुळे या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षकास सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

घरफोड्या, सोनसाखळी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, रस्त्यावर खुलेआम मद्याची विक्री, हातगाड्यांवर होणारी मद्याची विक्री असे अनेक प्रकार गेल्या दोन महिन्यात या परिसरात वाढले आहेत.असे असताना येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक पद भरले जाणे अत्यंत आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com