KEMमधील कोव्हिशील्ड 95 स्वयंसेवकांना लसीचा दुसरा यशस्वी डोस

भाग्यश्री भुवड
Monday, 30 November 2020

पालिकेच्या केईएम रुग्णालयामधील कोव्हिशील्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या 101 जणांना या लसीचा डोस दिला जाणार होता. मात्र, दुसऱ्या फेरीत 6 जण सहभागी झाले नाहीत. त्यामुळे 95 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण ९५ जणांना दुसऱ्या फेरीतील डोस देण्यात आले असून केईएममधील डोस पूर्ण झालेत.

मुंबई: पालिकेच्या केईएम रुग्णालयामधील कोव्हिशील्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या 101 जणांना या लसीचा डोस दिला जाणार होता. मात्र, दुसऱ्या फेरीत 6 जण सहभागी झाले नाहीत. त्यामुळे 95 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. एकूण ९५ जणांना दुसऱ्या फेरीतील डोस देण्यात आले असून केईएममधील डोस पूर्ण झालेत. आता 21 मार्चपर्यंत या स्वयंसेवकांचे निरीक्षण केले जाणार आहे. जर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले तर त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, नायरमध्ये फक्त 16 स्वयंसेवकांना लसीचा डोस देणे बाकी आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात नायरमध्येही या लसीचा टप्पा पूर्ण होईल अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. 

नायरमध्ये पहिला डोस १४५ जणांना दिला गेला. आतापर्यंत दुसरा डोस 129 जणांना दिला आहे तर 16 जणांना देणे बाकी आहे. म्हणजे एकूण 145 स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.

अधिक वाचा-  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दुधाचा टॅंकर उलटला; महामार्गावर वाहनांचा खोळंबा

ऑगस्ट महिन्यात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) किंग अ‍ॅडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयासह नायर रुग्णालयाची निवड केली. सुरुवातीला नायर रुग्णालयात 100 स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देण्याची सूचना देण्यात आली. मात्र नंतर आयसीएमआरच्या परवानगीने त्यांनी दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी आणखी 45 स्वयंसेवकांची निवड केली. जवळपास 129 निरोगी स्वयंसेवकांना क्लिनिकल चाचणीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. आता फक्त 19 स्वयंसेवक बाकी आहेत. स्वयंसेवकांना 28 दिवसांनंतर क्लिनिकल चाचणीत दुसरा डोस देण्यात आला आहे. या आठवड्यात सर्व डोस पूर्ण होतील, असे ही डॉ. भारमल यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केईएममध्ये 6 जणांचा लसीला नकार

101 पैकी 6 जणांनी दुसरा डोस घेण्यास नकार दिला आहे. अशा प्रकारे आम्ही 95 जणांना डोस पूर्ण केला आहे. दोन्ही 2 डोस पूर्ण झाले आहे. आता मार्च 2021 पर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहोत. दर महिन्याला त्यांची फोनद्वारे चौकशी केली जाणार आहे. पाठपुरावा घेतला जाणार आहे. पुढच्या कोणत्याही इतर तपासाची गरज लागणार नसल्याचे ही केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

second phase Covishield vaccine KEM completed second successful dose vaccine 95 volunteers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second phase Covishield vaccine KEM completed second successful dose vaccine 95 volunteers