दिलासादायक! डहाणूतील 'त्या' 3 वर्षीय चिमुरडीची दुसरी चाचणी निगेटिव्ह

corona
corona

डहाणू : डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तीन वर्षांच्या मुलीची कोरोना संसर्गाची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याची माहिती पालघर आरोग्य विभागाने दिली.

पालघर तालुक्यातील काटाळे या ठिकाणी असलेल्या वीटभट्टीवर या चिमुकलीचे पालक काम करत होते. या मुलीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिला प्रथम मासवण नंतर कासा व पुढे डहाणूच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. या चिमुकलीचा परदेशातून आलेल्या कोणाशीही थेट संपर्क न आल्याने आणि तरीही कोरोनाचा संसर्ग झाल्याने स्थानिक पातळीवर तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.

डहाणूकरांना दिलासा
या मुलीला कोरोनाची बाधा झाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या पालघर तालुक्यातील मासवण व काटाळे विभागातील 20, डहाणू तालुक्‍यातील सुमारे 40 तर विक्रमगड येथील सुमारे 15 व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या मुलीच्या फेरतपासणीचा अहवाल नकारात्मक आल्याने डहाणूकर जनतेसह पालघर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com