कोरोनाची दुसरी लाट आली तर महागात पडेल; आरोग्यमंत्री राजेश टोपे

तुषार सोनवणे
Friday, 20 November 2020

राज्यातही अशी लाट येऊ शकते. आणि राज्यात दुसरी लाट आल्यास ती आपल्याला महागात पडू शकेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

मुंबई - युरोपह सह अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जाणवतोय. देशातही दिल्ली आणि केरळ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून त्याठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसागणित वाढत आहेत. राज्यातही अशी लाट येऊ शकते. आणि राज्यात दुसरी लाट आल्यास ती आपल्याला महागात पडू शकेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - टीआरपी गेरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुन्हा दाखल

राज्यात कोरोनाचा कहर नवरात्री नंतर काहीसा कमी होतांना दिसत होता. परंतु दिवाळीतील नागरिकांच्या बाजारातील गर्दी मुळे कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. देशात दिल्ली आणि केरळ मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. सध्या दिल्लीत दिवसाला 5 हजारापेक्षा अधिक कोरोनारुग्णांची नोंद होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे.महाराष्टात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये असं वाटतं परंतु तरीही चिंता वाटते. असे टोपे यांनी म्हटले आहे. राज्यातील जनतेने केरळ आणि दिल्लीतला वेध घेतला पाहिजे. असं सूचक विधान टोपेंनी केलंय.

हेही वाचा - शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा सावळा गोंधळ; नियोजनाअभावी कल्याण-डोंबिवलीत तारांबळ

दिल्ली आणि केरळमध्ये लोकांनी कोरोनाचं गांभीर्य सोडून मास्कच्या वापराकडे दूर्लक्ष केल्याने संसर्ग वाढत असल्याचे टोपे  यांनी म्हटले आहे. लोकं कोरोनाला गृहित धरत आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्यास आपल्याला महागात पडू शकते असेही टोपे यांनी म्हटले आहे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A second wave of corona would cost more Health Minister Rajesh Tope