राज्यात दर दिवशी एका तासाला सरासरी 21 लोकांचा मृत्यू

आताच सावरलो नाही तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत
Corona
CoronaMedia Gallery

आताच सावरलो नाही तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

मुंबई: राज्यात (Maharashtra) कोरोना महामारी (Coronavirus) आल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर भार पडला. मात्र, कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) राज्यातील जनतेसाठी बरीच जीवघेणी ठरली. या दुसर्‍या लाटेत राज्यात दर दिवशी एका तासाला सरासरी 21 लोकांचा (Average 21 Deaths in an hour per day) जीव जात असल्याची माहिती आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही आकडेवारी पाहता आपण अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, नाहीतर तिसरी लाट आणखी प्राणघातक ठरु शकते. (Second Wave seen Average 21 Deaths in an hour per day in Maharashtra State study reveals)

Corona
मुंबईकरांनो सावधान! पावसाबद्दलची ही बातमी नक्की वाचा

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला 10 फेब्रुवारी 2021 पासून सुरूवात झाली. बघता बघता कोरोनाचा विळखा एवढा घट्ट होत गेला की त्याच्या संसर्गापासून कोणताही जिल्हा वाचला नाही. फक्त 126 दिवसांत, व्हायरसच्या संसर्गामुळे 62,764 लोकांचा मृत्यू झाला. तर, पहिल्या लाटेत म्हणजेच 9 फेब्रुवारी ते 9 मार्च 2020 दरम्यान एकूण 5130 लोकांचा मृत्यू झाला होता. वरील आकडेवारीनुसार, पहिल्या लाटेत प्रत्येक दिवशी दर तासाला सरासरी 6 मृत्यू होत होते.

राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले की, हा विषाणू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. सुरुवातीला तो एवढा घातक वाटत नव्हता. पण, यामुळे बरेच नुकसान झाले आहे. ही आकडेवारी पाहता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पहिली लाट नियंत्रित आल्यानंतर ज्या चुका केल्या त्या पुन्हा करता कामा नये नाहीतर पुन्हा एकदा त्याच टप्प्यातून जावे लागेल.

Corona
"तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही..."; शिवसेनेला 'चॅलेंज'

पुण्यात मुंबईपेक्षाही बिकट स्थिती

कोरोना रुग्णसंख्या आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. 15 जूनपर्यंत मुंबईत एकूण 7,16,351 लोकांना या विषाणूची लागण झाली असून त्यापैकी 15, 216 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर, पुण्यात 1004382 लोक संक्रमित झाले असून 15593 लोकांचा मृत्यू झाला.

सर्वाधिक मृत्यूंचे पाच जिल्हा-

जिल्हा - मृत्यू

पुणे- 15593

मुंबई- 15216

ठाणे- 9837

नागपूर- 8148

नाशिक- 6595

Corona
भक्ती पार्क मेट्रो स्टेशनसाठी पुन्हा झाडांची कत्तल

मृत्यूदर दोन टक्क्यांच्या जवळ

राज्यात एक काळ असा होता की कोरोना मृत्यूदर 1.5 टक्क्यांच्या खाली गेला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत संख्या इतकी वाढली की मृत्यूदर 1.93 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दररोज 200 हून अधिक मृत्यू होतात.

मृत्यूदराच्या बाबतीत दुर्दैवाने राज्य तिसऱ्या स्थानावर

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत राज्य तिसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वात वाईट मृत्यू दर पंजाबचा 2.66 टक्के, दूसरे स्थानावर उत्तराखंड 2.07 टक्के आणि 1.9 मृत्यूदरासह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे.

Corona
प्रदीप शर्माकडेही सापडली सचिन वाझेसारखीच रिव्हॉल्वर

राज्यात दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत आधीपेक्षा घट आहे. पण, काही दिवसांपासून ग्रामीण भागातील पूर्वीच्या मृत्यूची आकडेवारीही यादीत जोडली जात आहे. ज्यामुळे एकूण मृत्यूची संख्या झपाट्याने वाढताना दिसते. मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे ग्रामीण भागात रुग्णालयांची पायाभूत सुविधा नसणे आणि काही प्रमाणात डॉक्टरांमध्ये अनुभवाचा अभाव हे आहे. यासाठी आम्ही सतत डॉक्टरांशी चर्चा करतो. आता राज्य सरकारला आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

-डॉ. अविनाश सुपे, अध्यक्ष, मृत्यू निरीक्षण समिती.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com