उदय सामंत यांची सुरक्षा वाढवली, धमक्यांचे फोन आल्यानंतर देण्यात आली Y अधिक एस्कॉर्टस सुरक्षा

सुमित बागुल
Friday, 25 September 2020

महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमक्यांचे फोन येतायत.

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमक्यांचे फोन येतायत. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतची माहिती स्टेट इंटेलिजन्स म्हणजेच राज्य गुप्तवार्ता विभाग आणि पोलीस महासंचालकांना दिली आहे. मंत्री उदय सामंत यांना धमकीचे फोन येतायत. अशात आता राज्य सरकारकडून उदय सामंत यांना Y अधिक एस्कॉर्टस अशी सुरक्षा दिलेली आहे. 

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे अमरावती विद्यापीठात परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांना धमकीचा फोन आलेला. स्वतः उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली  होती. सामंत यांच्या स्वीय सहायकाच्या फोनवर हा फोन आला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हा फोन आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. उदय सामंत हे अमरावतीवरून नागपूरला जात होते. सामंत यांना नागपुरात पोहचू देणार नाहीत असं धमकी देणाऱ्याने फोनवर सांगितलं होतं.  

महत्त्वाची बातमी : राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

या प्रकरणावर उदय सामंत काय म्हणतायत ? 

उदय सामंत यांनी या प्रकारावर भाष्य केलंय. आपण अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं ते म्हणालेत. काही विद्यार्थी संघटना त्यांच्या राजकीय पक्षांना खुश करण्यासाठी असं काहीतरी केलं जातंय असं सामंत म्हणालेत. आपण विदयार्थ्यांच्या हिताचं काम करत आहोत. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी चर्चा करावी, काही सुधारणा असल्यास आम्ही त्याचा जरूर स्वीकार करू, असंही उदय सामंत सामंत म्हणालेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: security of higher and technical education minister uday samant increased after threat calls