पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अकलोली कुंडावर प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी सुरू

दीपक हीरे
मंगळवार, 17 जुलै 2018

रस्त्यावर अथवा धोकादायक ठिकाणी पर्यटकांना आपली वाहने उभी करता येणार नाहीत. म्हणून रोलिंग टाकण्यात आले आहे. नदी पात्रात जाणे अथवा त्याखाली बसणे यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे.

वज्रेश्वरी (जि. ठाणे) - ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, अकलोली कुंड या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व तानसा नदी व वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी, जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळाभर या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून या आदेशाची अंमलबजावणी गणेशपुरी पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक शेखर डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.

अकलोली कुंड येथील तानसा तीरावरील कुंडजवळ येथील ग्रामपंचायत, पोलिस पाटील अजय पाटील भूपेंद्र शाह, चंद्रकांत वेतुरकर आदी ग्रामस्थांची मदत येथे घेतली जात आहे. रस्त्यावर अथवा धोकादायक ठिकाणी पर्यटकांना आपली वाहने उभी करता येणार नाहीत. म्हणून रोलिंग टाकण्यात आले आहे. नदी पात्रात जाणे अथवा त्याखाली बसणे यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे. मद्य जवळ बाळगणे, वाहतूक करणे, मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तसेच महिलांची टिंगल टवाळी, छेडछाड करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. धबधबे, दऱ्याचे कठडे तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे चित्रीकरण करणे यास प्रतिबंध आहे. ध्वनी, वायू व जल प्रदूषण करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाणार आहे. सांयकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत येथील धबधबे, तलाव, धरणे येथील पाण्यात उतरण्यास प्रतिबंध करण्यात आहे.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची 10 जुलै पासून घाटात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अकलोली कुंड येथे येथे नदी पात्रत गरम पाण्याचे कुंड असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकाची संख्या असते. मद्यपान करून हुल्लडबाजी करण्याची संख्याही जास्त असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व जीवित हानि टाळवी म्हणून हे आदेश लागू करण्यात आले आहे आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी प्रकिया संहिता कलम 144 (1) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: For the security of the tourists the implementation of the order of preventive command on the Akholi Kunda