Sadabhau Khot : बियाणे घरात ठेवल्याने शेतकऱ्याच्या घरावर छापा; सदाभाऊ खोत, अधिकाऱ्यांच्या निलंबितची मागणी

Mumbai News : राज्यात खरीप पेरणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या घरावर पोलिसांकडून सुरू असलेल्या छापासत्रामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात खोत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"Former Minister Khote Condemns Police Action Against Farmer"
"Former Minister Khote Condemns Police Action Against Farmer"Sakal
Updated on

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील बिडगाव येथे शेतकरी रमेश घाटोडे यांच्या निवासस्थानी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एसीबी) पथकाने अचानक छापा घालून ‘एचटीबीटी’ बियाणे जप्त केले. तसेच त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीही सुनावण्यात आली. माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com