
धक्कादायक ! मुंबईत 1 हजारात बोगस लसीकरण प्रमाणपत्र
रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : कोरोनाची एकही लस न घेता अनेक नागरिकांकडे दोन्ही लसींचे (two dose vaccination certificate) प्रमाणपत्र आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे बोगस प्रमाणपत्र (fake certificate) विकणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. सेकारन नाडार असं या व्यक्तीचं नाव आहे. धारावीतून त्याला अटक (culprit arrested) करण्यात आली आहे. (sekaran nadar arrested in fake vaccination certificate crime)
हेही वाचा: निलंबित पोलिसाने केला महिलेचा विनयभंग
36 वर्षांच्या सेकारन नाडर याचा धारावी भागात इटरनेट कॅफे आहे. या कॅफेतून बनावट प्रमाणपत्र बनवून विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी एक डमी ग्राहक बनवून एका व्यक्तीला पाठवलं, त्या व्यक्तीला प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅफेवर छापा टाकला, त्याच कॅफेतून प्रमाणपत्र दिले जात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले, तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली.
कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे, अनेक ठिकाणी प्रवेशासाठी, प्रवासासाठी नागरीकांना कोरोनाच्या प्रमाणपत्राची गरज पडतेय. लस न घेतलेल्या नागरिकांना अडचण येते, यावर बोगस प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे. मुंबईत याआधीही पोलिसांनी अशी प्रमाणपत्र देणाऱ्या दोघांना अटक केली होती. सेकारन नाडर 1 हजार रुपयांत एक प्रमाणपत्र विकत होता.
कसं मिळत होतं प्रमाणपत्र
सेकारन नाडर हात्याच्याकडं आलेल्या ग्राहकाचा मोबाईल नंबर आणि आधारकार्ड नंबर हा दुसऱ्या राज्यात बसलेल्या डॉक्टरला पाठवत होता. तो तिथून लॉगीन करुन त्या ग्राहकानं लस घेतली असं दाखवून रजिस्ट्रेशन करत होता आणि ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर लसीकरण झाल्याचं सर्टिफीकेटही मिळत होतं. कोविन अॅपवरही त्या नागरिकानं लस घेतल्याचं रजिस्टर होत होतं. नाडारनं नक्की किती जणांना असे प्रमाणपत्र विकलेत याचा आम्ही तपास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
Web Title: Sekaran Nadar Arrested In Fake Vaccination Certificate Crime Mumbai Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..